बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. निवडणूक 08
Written By भाषा|
Last Modified: आयझोल , सोमवार, 8 डिसेंबर 2008 (17:20 IST)

मिझोरममध्‍ये कॉंग्रेसला स्‍पष्‍ट बहुमत

मिझोरम विधानसभेसाठी झालेल्‍या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून येथील सत्तारूढ एमएनएफला जोरदार धक्‍का देत कॉंग्रेसने बहुमत मिळविले आहे. या राज्‍यात कॉंग्रेसने 29 जागा मिळवून स्‍पष्‍ट बहुमत मिळविले आहे.

राज्यातील सत्तारुढ मिजो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) या पक्षाला जोरदार हादरा बसला असून पक्षाचे नेते मुख्‍यमंत्री जोरामथंगा हे आपल्‍या विधानसभा मतदार संघातूनच पराभूत झाले आहेत. एमएनएफने पाच जागा मिळविल्‍या आहेत. तर मिजो पीपल्स कॉंफ्रेन्‍सला एक जागेवर समाधान मानावे लागले आहे. युडीएने दोन जागा जिंकल्‍या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री जोरामथंगा हे आपली आमदारकीही सांभाळू शकले नाहीत.