बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. निवडणूक 08
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 8 डिसेंबर 2008 (16:42 IST)

राजेंच्या दहशतीविरूद्ध जनाधार: गेहलोत

राजस्थानमधील मतदारांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या दहशतीच्या राजवटीविरूद्ध मतदान केले असल्याचेचे कॉंग्रेसचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या मुद्दयावर भाजपने रान उठवल्यानंतरही राजस्थानमधील मतदारांनी कॉंग्रेसलाच मतदान केले आहे. यामधून या मुद्दयाचा त्यांच्यावर प्रभाव पडला नसल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणाले.

राजे यांच्या राजवटीत सामान्यजन दहशतीच्या छायेत होते. या जनाधारातून त्यांना या दहशतीच्या सावटातून बाहेर पडायचे होते, हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले. वसुंधरा राजे यांचे वचन आणि वचनपूर्ती यामध्ये मतदारांना कमालीची तफावत जाणवली.

भाजपने दिलेले आश्वासने आणि केलेली कामे यातील फरक त्यांनी जाणला. पोलिस गोळीबाराच्या २७ घटनांत ९१ शेतकरी बळी पडले. मिना आणि गुज्जर समाजात असंतोष निर्माण झाला आणि त्यांना राज्य सरकारने फसवल्याचे ज्ञात झाले.

एकंदरीत राजे यांच्या नेतृत्वाखालीली राजवट सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा दावा गेहलोत यांनी केला.