बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मराठी निबंध
Written By

ईद विशेष निबंध इस्लामिक आनंदाचा सण ईद

eid ramdan
इस्लामिक कॅलेंडरमध्ये दोनदा ईद साजरी केली जाते. ईद उल फितर आणि ईद उल अझा. इस्लाममध्ये रमजान ईद हा खूप आनंदी दिवस मानला जातो. ईदच्या दिवशी लोक अल्लाहला त्यांनी केलेल्या पापाची क्षमा मागतात, तर ते आपल्या आप्तेष्ठयांसाठी देखील अल्लाह ला प्रार्थना करतात. 
ईद उल फितरचा दिवस रमजानच्या पवित्र महिन्यानंतर येतो जेव्हा संपूर्ण लोक संपूर्ण महिन्यात रमजान उपवासानंतर अल्लाहला प्रार्थना करतात. या नंतर शव्वाल चा महिना येतो 
आणि ईद उल अझा इस्लामिक कॅलेंडरच्या शेवटच्या वर्षात जुल हज महिन्याच्या 10 तारखेला साजरी केली जाते.
 या दिवशी हाजी हजरतचा हज संपतो आणि जगभरातील लोक कुर्बानी किंवा बलिदान देतात.
शरीयतनुसार प्रत्येक स्त्री-पुरुषासाठीही बलिदान योग्य आहे, ज्याच्या कडे 13 हजार रुपये किंवा त्याच्या सम प्रमाणात सोन किंवा चांदी किंवा तिन्ही सोन,चांदी आणि रुपये मिळवून 13 हजार रुपये च्या बरोबर आहे. दोन्ही ईद चे शरियतीनुसार खूप महत्त्व आहे. ईद सामाजिक बंधुता वाढवते. जगभरात मुस्लिम बांधवाना इतर धर्माचे लोक ईदची शुभेच्छा देतात. 
ईदच्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील लोक खास प्रार्थना करतात,त्याला नमाज पठण असे म्हणतात .नमाज पठणासाठी ते शहरात एका ठिकाणी जमतात, ते ठिकाण ईदगाह असे म्हणवले जाते.
सामूहिक नमाज पठण नंतर लोक एकमेकांची गळाभेट घेतात. आणि एक मेकांना शुभेच्छा देतात. ईद ची वाट सर्वच आतुरतेने बघत असतात. मुलं तर खूप आनंदी असतात. कारण त्यांना या दिवशी मोठे काही भेट वस्तू देतात. ईदच्या सणाचा उल्हास  विशेषतः मुलांमध्ये दिसून येतो.  
इस्लामिक मान्यतानुसार पवित्र महिन्यातील रमजान संपल्यानंतर जवळपास सत्तर दिवसानंतर साजरा केला जाणारा कुर्बानी किंवा बलिदानाचा हा ईद चा सण इस्लाम धर्मात विश्वास  करणाऱ्या लोकांचा मुख्य सण आहे. 
ईदच्या या सणाची सर्व इस्लामिक मुस्लिम बांधवाना शुभेच्छा.