गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By
Last Modified: सोमवार, 27 मार्च 2023 (13:14 IST)

नवरात्री व्रत स्पेशल रेसीपी: चमचमीत आणि चविष्ट साबूदाण्याची खिचडी

sabudana
नवरात्री असो किंवा कोणताही उपवास असो फराळासाठी खास साबुदाण्याची खिचडी रेसिपी सांगत आहोत. चला साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
साहित्य -
250 ग्रॅम साबुदाणा, 1/4 कप दाण्याचं कूट, 1 उकडलेला बटाटा, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा काळी मिरी पूड, 2 ते 3 बारीक चिरलेल्या मिरच्या, 1लहान चमचा साखर, सेंधव मीठ चवीपुरती, लिंबू, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि उपवासाचे फरसाण.
 
कृती -
साबूदाण्याची खिचडी बनविण्यासाठी साबूदाण्याला 3 ते 4 तास भिजवून ठेवा. बटाटे सोलून तुकडे करा. एक कढईत तूप गरम करून त्यामध्ये जिरे, आणि हिरव्या मिरच्याचे तुकडे घाला. नंतर चिरलेले बटाटे घाला आणि मंद आचेवर शिजू द्या. शिजत आल्या वर त्यामधे भिजत टाकलेला साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट घाला आणि मंद आचेवर वाफवून घ्या. त्यामधे मीठ, काळी मिरपूड आणि साखर घालून मिसळून घ्या. चविष्ट अशी साबूदाण्याची खिचडी कोथिंबीर, उपवासाचे फरसाण आणि लिंबू घालून सर्व्ह करा.
 
Edited By- Priya Dixit