बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर,
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन..
स्वतःच्या इच्छा आकांशा बाजूला ठेवून,
मुलांसाठी झटणारं अंतःकरण…
Fathers Day च्या शुभेच्छा!
स्वतः टपरा मोबाईल वापरून,
तुम्हाला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो,
तुमच्या प्रीपेड चे पैसे स्वतःच भरतो,
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो,
तो बाप असतो…
Fathers Day च्या शुभेच्छा
चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो,
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो,
तो बाप असतो…
Fathers Day च्या शुभेच्छा!
कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा..
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरूपी बाबा…
Fathers Day च्या शुभेच्छा!
बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला..
हाडांची काडे करून आधार देतो मनामनाला…
Fathers Day च्या शुभेच्छा!
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता,
आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…
Fathers Day च्या शुभेच्छा!
आपले चिमुकले हाथधरून जे
आपल्याला चालायला शिकवतात...
ते बाबा असतात
आपण काही चांगले केल्यावर .
जे अभिमानाने सगळ्याना सांगतात... .
ते बाबा असतात.
माझ्या लेकराला काही कमी
पडू नए या साठी जे घाम गाळतात....
.....ते बाबा असतात.
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना
जे आपल्याला चुकताना सावरतात..
ते बाबा असतात.
आपल्या लेकराच्या सुखा
साठी जे आपला देह ही
अर्पण करतात..... ....ते बाबा असतात
Fathers Day च्या शुभेच्छा!
चट्का बसला, ठेच लगली,
फटका बसला तर
"आई ग...!"
हा शब्द बाहेर पडतो,
पण
रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ
येऊन ब्रेक दाबतो तेव्हा
"बाप रे!"
हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासठी आई चालते पण मोठ्मोठी वादळ
पेलताना बापच आठवतो.
Fathers Day च्या शुभेच्छा!
"बाप बाप असतो...
तो काही शाप नसतो....
तो आतून कँनव्हास असतो...
मुलासाठी राब-राब राबतो...
बुडणार्या सुर्याकडे उगाच पाहत बसतो.
पायाच्या नखानी माती उकरत असतो.
शेवटी सर्वानीच साथ सोडली असते.
पाखरं घर सोडून दुर निघुन गेलेली असतात.
बाप मात्र आपल्या पाखराची वाट पाहतो.
Fathers Day च्या शुभेच्छा!
Edited By- Priya Dixit