शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. फिल्मोग्राफी
Written By वेबदुनिया|

देव आनंद वाढदिवस विशेष

WD
देव आनंद यांचा जन्म 26 सप्टेंबर 1923ला पंजाबच्या गुरदास कस्बेमध्ये झाला होता. त्यांचे वडील पिशोरीमल एक ख्यातनम वकील असून कांग्रेस कार्यकर्ता देखील होते आणि स्वतंत्रता आंदोलनात जेलमध्ये ही गेले होते. ते हिंदी /इंग्रेजी/संस्कृत/उर्दू/पंजाबी/ अरबी/जर्मन/हिब्रू सारख्या भाषा बोलत होते. गीता आणि कुरानवर त्यांचा अधिकार होता आणि बायबिलबद्दल ते नेहमी म्हणायचे की जर इंग्रजी शिकायची असेल तर बायबिलचे पठन करा.

हिंदी चित्रपटसृष्टीत देवानंद याचे नाव रोमांसचे बादशहा म्हणून आहे. त्यांनी आपल्या आत्मकथेतही 'रोमांसिंग विद लाईफ' या शीर्षकाने सुरुवात केली आहे. देश-विदेशातून याचे स्वागत झाले. आपले फिल्मी ‍जीवन प्रेममय करणाऱ्या व इतरांना जीवनाची उमेद देणा-या देवसाहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या 'रोमासिंग' चित्रपट प्रवासावर एक नजर फिरवू.


चूप-चूप खड़े हो जरूर कोई बात है

WD

सुरुवातीस सुरैयांच्या प्रेमात गुरफटलेल्या देवसाहेबांच्या रोमान्सचे अनेक किस्से मुंबईच्या मरीन ड्राइव येथील कृष्णा महालाच्या समोर गाजले. आपला आवाज आणि फोटोंच्या माध्यमातून ते प्रत्येक हॉटेल, पान दुकानांमध्ये पोहोचले. सुरैयांच्या चाहत्यांची त्या ठिकाणी गर्दी होऊ लागली. सुरैया यांना मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. पण, भारत- पाकिस्तान फाळणी आणि हिंदू - मुस्लिम यांच्यातील दरी त्यांच्या प्रेमाच्याही आड आली. चित्रपटातील नकली दारे आता त्यांच्या आयुष्यात उभी राहिली होती. देवसाहेबांनी 'टॅक्सी ड्रायवर' या चित्रपटाच्या सेटवरच कोणाला काही कळायच्या आत आपली नायिका कल्पना कार्तिकाबरोबर दहा मिनिटांत लग्न केले. याबरोबरच सुरैया प्रकरणाला पूर्णविराम मिळाला. पण, सुरैया त्यांचे प्रेम विसरू शकल्या नाहीत आणि त्या अविवाहित राहिल्या.

पुढे पहा हम है राही प्यार के...


हम है राही प्यार के

WD

देवानंद यांना नव्या नायिकांबरोबर रोमांस करणे, सेटवर दंगामस्ती करणे आणि वेगळ्याच धुंदीत प्रेमगीते म्हणण्याची म्हणण्याची सवय होती. गीताबाली यांच्याबरोबर त्यांनी बाजी, जाल, फरार आणि मिलाप या चित्रपटांमध्ये आपली रोमांटिक इमेज कायम राखली. त्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री मधुबाला यांनाही त्यांनी आकर्षित केले होते. निराला, नादान, जाली नोट आणि अरमान या चित्रपटात या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केले. नौ दो ग्यारह, हमसफर, टॅक्सी ड्रायवर और मकान नंबर 44 या चार चित्रपटांमध्ये कल्पना कार्तिक त्यांच्याबरोबर होत्या.

जीने की तमन्ना और मरने का इरादा

WD

त्यानंतर वहिदा रेहमान ही त्यांची आवडती नायिका बनली. 'सोलवा साल' या चित्रपटातून या जोडीचा प्रवास सुरू झाला आणि 'है अपना दिल तो आवारा, न जाने किस पे आएगा' असे गुणगुणत पुढे चालू राहिला. 'काला बाजार', रूप की रानी आणि 'गाईड' पर्यंत हा प्रवास सुरू होता. 'गाइड' या चित्रपटाचे कथानक थोडे 'अडव्हान्स' असल्याने दिग्दर्शक विजय आनंद यांनी यातील गीते इतक्या खुबीने चित्रीत केली की, ती आजही गुणगुणली जात आहेत. गुरुदत्त याच्या निधनाने त्यांना धक्का बसला आणि वहिदा यांच्यापासून ते दूर होत गेले.

एक घर बनाऊँगा तेरे घर के सामन

WD

देवसाहेबांच्या समवेत काम केले नाही, अशी त्याकाळात एकही नायिका नव्हती. 'सीआयडी' चित्रपटात शकिला तर 'राही' आणि 'मुनीमजी' मध्ये नलिनी जयवंतला साथ दिली. 'मुनीमजी' मध्ये देव आनंद यांचा डबल रोल होता. होता. नूतन आणि त्यांची जोडीही दर्शकांना आवडली. बारिश, पेइंग गेस्ट, मंजिल आणि तेरे घर के सामने मध्ये या जोडीने आपल्या रोमांसने दर्शकांना भिजवून टाकले.'पतिता' आणि 'दुश्मन' चित्रपटात उषा किरण त्यांची मैत्रीण होती. पतितामधील गीत आजही लोकांच्या ओठावर आहे. 'अंधे जहान के अंधे रास्ते', 'लव मैरिज' मध्ये ते देव माला यांच्याबरोबर दिसले. 'बंबई का बाबू' मध्ये बंगालची तारका सुचित्रा सेन बरोबर त्यांनी काम केले. साठच्या दशकात आशा पारेखही त्याच्या आवडीची नायिका होती. 'कहीं और चल' आणि 'महल' या चित्रपटांमधू त्यांनी दर्शकांना अक्षरशः: वेड लावले. 'हम दोनों' मध्ये नंदा या देखील काही वेळापुरत्या देवा आनंद यांच्या हमसफर होत्या.

दम मारो दम...

WD

सत्तराव्या दशकाच्या कालावधीत दिग्दर्शक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. या दशकात ज्या अभिनेत्री त्यांच्या सहवासात आल्या त्या त्यांच्या चाहत्या बनल्या. दारासिंग यांच्या पैलवानी आखाड्यातून बाहेर पडून मुमताज जेव्हा देवसाहेबांकडे आली तेव्हा त्या लोकप्रिय झाल्या. 'हरे रामा हरे कृष्णा', 'तेरे मेरे सपने' अशा चित्रपटातून पुढे जाऊन त्या राजेश खन्ना यांच्या कॅंपमध्ये दाखल झाल्या. पण, देवसाहेबांसाठी जाता जाता बोल्ड वेस्टर्न तारका जीनत अमान हिला सोडून गेल्या. देव व जीनत यांच्या जोडीचा रोमांस आता शब्दात व्यक्त करता येणारा नाही. दम मारो दम ची हवा झाल्यानंतर हिरा पन्ना, इष्क-इष्क-इष्क, प्रेम शास्त्र, वारंट, डार्लिंग-डार्लिंग, कलाबाज सारख्या चित्रपटांनी जीनतने देवसाहेबांवर मोहिनीच टाकली. याचदरम्यान हेमा मालिनी यांचा प्रवेश झाला. ही जोडीही दर्शकांना पसंत पडली. 'देस-परदेस' मध्ये टीना मुनीमला संधी दिल्यानंतर त्यांनी पुढील प्रत्येक चित्रपटासाठी नवीन चेह-यांना संधी देण्याचा प्रयत्न केला.'लूटमार' आणि 'मनपसंद' हे चित्रपट टीनाबरोबर करतानाही लोकांनी पसंत केले पण, त्यांच्यावर वयाची बंधने येत असल्याचे जाणवू लागले. त्यांनी रीचा शर्मा (हम नौजवान), एकता (अव्वल नंबर), फातिमा (सौ करोड़), मनू गार्गी (गैंगस्टर), सेबरीना (मैं सोलह बरस की) सारख्या अनेक अभिनेत्रींबरोबर काम केले.