शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. फिल्मोग्राफी
Written By वेबदुनिया|

व्यक्तिविशेष : महंमद रफी (पहा व्हिडिओ)

WD
'चाहे कोई मुझे जंगली कहे....', 'सुहानी रात ढल चुकी', 'चौदहवी का चांद हो', 'तेरे मेरे सपने...' अशी एकाहून एक सरस गाणी ‍रसिकांच्या मनात कोरून ठेवणार्‍या गायक महंमद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमधील अमृतसरजवळील कोटला सुलतानसिंह या गावात झाला. त्यांच्या कुटुंबाचा गाण्याशी काही संबंध नव्हता. त्यांचे गाणे ऐकून त्यांच्या मोठ्या भावाने उस्ताद अब्दुल वहिद खान यांच्याकडे गाणे शिकण्यासाठी पाठवले. पुढे आकाशवाणीच्या एका कार्यक्रमात त्यांचे गाणे त्या काळातील प्रख्यात संगीतकार श्यामसुंदर यांनी ऐकले आणि त्यांना एका पंजाबी चित्रपटात गायची संधी दिली. त्यानंतर ते मुंबईत आले.

पहा व्हिडि

संगीतकार नौशाद यांन त्यांना 'अनमोल घडी' या चित्रपटा‍त गायची संधी दिली. नंतर 'शहीद', 'मेला' आणि 'दुलारी' यात के ‍गायिले. पण त्यांना 'बैजू बावरा'तील गाण्यांनी लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. 'तू गंगा की मौज...' 'मन तडपन हरी दर्शन को...' अशी एकाहून एक सरस गाणी त्यात होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी आघाडीच्या सर्व नायकांना आपला आवाज दिला. शंकर जयकिशन, सचिनदेव बर्मन, ओ. पी. नय्यर यांचे ते आवडते गायक होते.