शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. फिल्मोग्राफी
Written By वेबदुनिया|

सुरांचा राजा : आर.डी. बर्मन

जन्मदिन विशेष

WD
राहुल देव बर्मन हे पंचम म्हरून जास्त प्रसिद्ध होते. 27 जून 1939 रोजी त्यांचा जन्म कोलकाता येथे झाला होता. प्रसिद्ध संगीतकार सचिनदेव बर्मन हे त्यांचे वडील. त्यांच्याकडे त्यांनी सहाय्यक म्हणून काम करत असतानाच संगीतकाराची कारकिर्द सुरू केली. स्वतंत्रपणे संगीत दिलेला त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे छोटे नवाब.

त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. बहारों के सपने, चंदन का पालना, पडोसन, वारीस, प्यार का मौसम, कटी पतंग, अमर प्रेम, बुढ्ढा मिल गया, कारवाँ, हरे राम हरे कृष्ण, शोले, रामपूर का लक्ष्मण, आंधी, यादों की बारात, हम किसीसे कम नही, गोलमाल अशा जवळजवळ 331 चित्रपटांना त्यांनी संगीत दिले, आर. डी. बर्मन यांनी हिंदी चित्रपटात पाश्चात्य हिप्पी धाटणीचे संगीत असे आणले आणि लोक‍िप्रिय केले, त्याचप्रमाणे शास्त्रीय ढंगातील त्यांची गाणीही तितकिच लोकप्रिय झाली. सुरांच्या या राजाने 4 जानेवारी 1994 रोजी या जगाचा निरोप घेतला.