मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. परदेशातील संधी
Written By वेबदुनिया|

ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी स्कॉलरशिप

तुम्हाला विदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर सर्वात सुखकारक मार्ग म्हणजे स्कॉलरशिप. या माध्यमातून तुमचा तिथला खर्चही भागू शकतो आणि तुमच्या करियरसाठीही हे फायद्याचे आहे.

जगातील जवळपास सर्वच देश आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिप देतात. ब्रिटनमध्ये याची चांगली सुविधा आहे. ब्रिटिश सरकार आणि कॉमनवेल्थ कार्यालय यासाठी मदतनिधी पुरवतो. जवळपास 150 देश अशी स्कॉलरशिप देतात. या लेखात आपण ब्रिटनच्या शॉर्ट टेलर मेड प्रोग्रॅमविषयी माहिती करून घेणार आहोत.

1. ब्रिटिश चिवनिंग गुरुकुल स्कॉलरशिप इन लीडरशिप एड एक्सीलेंस (लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स एड पॉलिटिकल सायंस):-ही स्कॉलरशिप ग्लोबल गवरनेंस, मॅनेजमेंट, पब्लिक रिलेशन्स मेक्रोइकोनामिक्स, इंटरनेशनल रिलेशन, पॉलिटिक्स, इंटरनेशनल फायनेंस आणि इतर काही क्षेत्रात दिली जाते. भारतातून दरवर्षी 12 विद्यार्थी यासाठी निवडले जातात. या स्कॉलरशिपला शॉर्ट टर्म म्हणतात कारण ती ऑक्टोबरमध्ये दिली जाते आणि मार्चपर्यंत तिचा कालावधी असतो.

या अंतर्गत ट्यूशन फी, मेंटेनन्स अलाऊंस आणि विमानखर्चही दिला जातो. यासाठी अट म्हणजे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएट असावा, त्याला या क्षेत्रात पाच वर्षांचा अनुभव असावा, तसेच त्याचे शैक्षणिक रेकॉर्ड चांगले असणे गरजेचे आहे.

2. ब्रिटिश चिवनिंग मॅनेजर्स फॉर लीडरशिप कोर्स-
ही स्कॉलरशिप मॅनेजमेंट विषयासाठी दिली जाते. हि देखील शार्ट कोर्स स्कॉलरशिप आहे. याचा कालावधी दहा आठवड्यांचा आहे. भारतासाठी याची संख्या 12 आहे. यासाठी वयाची अट 25 ते 30 वर्षांची आहे. या स्कॉलरशिपमध्ये ट्यूशन फीस, राहण्याचा खर्च दिला जातो. विमान प्रवासाचा खर्च मात्र स्वतः:ला करावा लागतो. यातही अट म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री आवश्यक आहे.

3. ब्रिटिश चिवनिंग/मान्वेस्टर बिझनेस स्कूल शेयर्ड स्कॉलरशिप -
ही स्कॉलरशिप स्ट्रटेजिक मॅनेजमेंट साठी देण्यात येते. 4 ते 6 भारतीयांनाच ही स्कॉलरशिप दिली जाते. तीन आठवड्याच्या कालावधीसाठी ही स्कॉलरशिप दिली जाते.

यासाठी अट म्हणजे स्कॉलरशिपसाठी अर्ज केलेली व्यक्ती सीनिअर एक्झुकेटिव्ह असावी. एप्रिल महिन्यात याच्या प्रवेशाची अंतिम मुदत असते. आपल्याला उत्तम इंग्रजी येत असावे ही यातील सर्वात महत्त्वाची अट आहे. ब्रिटिश गर्व्हमेंट फॉरेन आणि कॉमनवेल्थ कार्यालय या स्कॉलरशिपसाठी पैसे देतो.

4. ब्रिटिश चिवनिंग प्रोग्रॅम फॉर यंग इंडियन बँकर्स (लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स एड पॉलिटिकल साइंस)-
हि स्कॉलरशिप बँकिंग आणि फायनेंस क्षेत्रासाठी दिली जाते. 12 भारतीयांना ही स्कॉलरशिप दिली जाते. या स्कॉलरशिपचा कालावधी तीन महिन्यांचा आहे.

लंडन स्कूल ऑफ इकोनामिक्समध्ये प्रवेशासाठी एमबीए फाइनेंस किंवा चार्टड अकाउटेंसीमध्ये पोस्टग्रेजुएशन डिग्री आणि मीडल लेवल बँकर्स किंवा पाच वर्षांचा बँकिंग क्षेत्रातला पाच वर्षांचा अनुभव यासाठी महत्त्वाचा आहे.