मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. परदेशातील संधी
Written By वेबदुनिया|

विदेशी शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती

WD
नजीकच्या काळात विदेशात जाऊन उच्चशिक्षण घेण्यासाठी खालीलप्रमाणे शिष्यवृत्तीच्या विशेष संधी उपलब्ध राहणार आहेत.

लुंड युनिव्हर्सिटी ग्लोबल स्कॉलरशिप
लुंड युनिव्हर्सिटी, स्वीडन येथे युरोपबाहेरील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येतात.

आवश्यक शैक्षणिक पात्रत
अर्जदरांनी लुंड युनिव्हर्सिटीच्या पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असाव व त्यांच्या शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.

शिष्यवृत्त
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित अभ्यासक्रमांच्या शैक्षणित शुल्काच्या 25 ते 100 टक्के रक्कम शिष्यवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क
अधिक माहिती व तपशिलासाठी लुंड युनिव्हर्सिटीच्या www.lunduniversity.lu.se या संकेतस्थळाला भेट द्यावी.