प्रकटला अकस्मात, कुणाला न ठावें
भोळा शंकर झाला अधीर, आला भुवर,
हाकेला तो धावून येईल, सदाच सत्वर,
प्रकटला अकस्मात, कुणाला न ठावें,
दर्शन मात्र त्याचे आपल्या प्रारब्धात लागते असावे,
ज्यांच्या मनी भाव, त्यांनी त्यास ओळखले,
कैवलीदानी लीला दावीत, शेगावी राहीले,
अपरंपार श्रद्धा हवी हो, ते सत्य जाणंण्या,
कुणाचा आहे तोच सद्गुरू, कुणी म्हणे त्यास "गण्या".
हाक मारा कोणतीही, पर अंतःकरण शुद्ध असावे,
त्याच्या कृपा प्रसादाला नेहमीच शिश झुकवावे!
...अश्विनी थत्ते