शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गजानन महाराज शेगाव
Written By
Last Updated : रविवार, 8 सप्टेंबर 2024 (10:45 IST)

संत गजानन महाराज पुण्यतिथी 2024 :संत गजानन महाराज यांना आवडणारे पदार्थ जाणून घ्या

zunka bhakar recipe
शेगावातील गजानन महाराज ह्यांना भगवान दत्तात्रेय आणि भगवान श्री गणेशाचा अवतार मानतात. हे दत्त संप्रदायाचे गुरु होते. त्यांचा जन्म कधी झाला या संदर्भात माहिती नाही ते 20 वर्षाचे तरुण म्हणून शेगावात अवतरले. आणि तो दिवस होता शके 1800, म्हणजे 23 फेब्रुवारी 1878 रोजी चा. हे श्री देविदास पातुरकर ह्यांच्या घरातील समारंभाच्या वेळीस घराच्या बाहेर टाकलेल्या उष्टया पत्रावळीतून अन्नाचे कण खाताना आणि गायी गुरांसाठी ठेवलेल्या पाण्याच्या ठिकाणाचे पाणी पिताना बंकटलाल अग्रवालच्या दृष्टीस पडले. सहा फुटी सडसडीत शरीर यष्टी, तांबूस वर्ण, तुरळक दाढी आणि केस, आजानुबाहू, दिगंबर असलेले, अनवाणी पाय आणि हातात चिलीम आणि त्याला कापड गुंडाळलेले, दिसायला अवलिया अशी त्यांची देहचर्या होती.  
 
महाराजांना आवडणारे पदार्थ आणि त्याच्या संदर्भात घडणाऱ्या गोष्टी -
महाराजांना झुणका भाकरीसह मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर, ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठलं हे पदार्थ फार आवडायचे. महाराजांना चहा देखील फार आवडायचा चहा विषयी त्यांना प्रेमच होते. चांदीच्या वाडग्यात ते चहा पीत असे.

महाराजांना पिठलं भाकर फार आवडत होती. शेगावचे शेगावला श्री म ना मोहोळकर हे हेडमास्तर होते आणि महाराजांचे भक्त देखील होते. त्यांची काकू रमाबाई ह्यांना महाराज म्हणाले की माई उद्या पिठलं भाकर आणा. रमाबाईंना वाटले की एवढा मोठा संत ह्यांना पिठलं भाकर कसे देऊ म्हणून त्यांनी पुरणपोळी बनवून नेली महाराजांनी ते ताट तिला फेकून मारले आणि चुन किंवा पिठलं भाकर आण म्हणाले. महाराजांनी लहानग्या दत्तात्रयेस घरून पिठलं भाकर सह कांदा घेऊन आणायला सांगितले. त्याने घरातून आणल्यावर ते आनंदाने खालले. 
 
महाराजांना अंबाडीची भाजी आणि ज्वारीची भाकरी फार आवडत होती. एकदा कुपटे गावाच्या देशमुखाने महाराजांना घरी बोलविले आणि पंच पक्वान्न तयार केले. जेवण्याचे ताट वाढणारच की महाराज त्यांच्या कडे महाजन म्हणून दिवाण काम करत होते त्यांच्या कडे जाऊन अंबाडीची भाजी आणि भाकर जेवायला मागू लागले. दुपारची भाकर आणि भाजी खाल्ल्यावर महाराज निघून गेले. 
 
पेढे 
महाराजांना पेढे खूप यायचे. ते त्यामधून एक पेढा खाऊन बाकीचे पेढे लहान मुलांना देत असे.
 
मिरचीचे वरण-
मुंडगावच्या बायजा बाई महाराजांना मिरचीचे वरण आणि ज्वारीची भाकरी देत होत्या.
 
चहा - महाराजांना सकाळी चहा आवडायचा. ते चांदीच्या वाडग्यात चहा पीत होते. त्यांची प्रकृती बिघडल्यावर त्यांना डॉ भाऊ कंवर महाराजांच्या न कळत चहातच औषध देत होते. पण महाराजांना ते ज्ञात असल्यामुळे ते चहा खाली टाकून देत असे.
 
खिचडी - 
पुंडलिकाची प्लेगची गाठ महाराजांने दूर केली. मुंडगावात असताना पुंडलिकास खिचडी खायची इच्छा झाली त्यांनी आपल्या आईला म्हटले की त्यांना खिचडी खायची आहे पण त्यांच्या आईने उद्या करेन असे सांगितल्यावर पुंडलिक रागावून घर सोडून शेगावात आले. तेव्हा बायजाबाई ने त्यांना विचारले की जेवण झाले की नाही. पण रागात असलेल्या पुंडलिकाने त्यांना काही उत्तर दिले नाही त्यावर महाराज बायजाबाईंना म्हणाले की बायजे माझ्या साठी केली खिचडी ह्याला दे, ती अजून गरम आहे. अशा प्रकारे पुंडलिकाला खिचडी मिळाली ती खाल्ल्यावर तो महाराजांना म्हणे की कशी माझ्या मनातली इच्छा महाराजांनी पूर्ण केली.