शनिवार, 27 डिसेंबर 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश चतुर्थी 2022
Written By
Last Modified: बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (07:55 IST)

गणपती विसर्जनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

Heavy rainfall
बुधवारपासून येत्या आठ दिवस म्हणजे १४ सप्टेंबपर्यंत संपूर्ण राज्यभरात विजा आणि गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, येत्या तीन दिवसांत गणपती विसर्जनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.
 
मुंबईसह संपूर्ण कोकणात,  गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत,  सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर,  उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत विशेषत: जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक विभागातदेखील मुसळधार पावसाची शक्यता  वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, परतीच्या पावसासाठीची सुरुवात झाल्याचे अनुकूल वातावरणीय वेध सध्या स्थिरवल्यासारखे जाणवतात. त्यामुळे माघारी फिरणारा मोसमी पाऊस कदाचित वेळ घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.