शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By वेबदुनिया|
Last Updated : बुधवार, 27 ऑगस्ट 2014 (12:20 IST)

गणपतीचे वाहन

वृ-वह म्हणजे वहाणे यापासून वाहन हा शब्द बनला आहे. देवांचे वाहन हे त्यांच्या कार्यानुसार त्या त्या वेळी बदलते. उंदीर हे गणपतीचे नित्याचे वाहन, पण त्याची इतरही वाहने आहेत.

आवाहन म्हणजे आवाहन. आवाहन केल्याशिवाय, म्हणजे निमंत्रणाशिवाय, देवही येत नाहीत. (मात्र भक्‍त संकटात असला, तर आवाहनाशिवायही देव लगेच धावून येतो.) आवाहन केले असता ज्या कार्यासाठी जायचे त्यासाठी पूरक वाहन आवश्यक असते, उदा. युद्धासाठी सिंह. हेरंब गणपतीचे वाहन सिंह, तर मयूरेश्वराचे वाहन मोर आहे.