शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Updated : मंगळवार, 8 सप्टेंबर 2015 (16:25 IST)

श्री गणपतीच्या विसर्जनास सुरुवात (पाहा फोटो)

सगळ्यांचे लाडके दैवत गणरायाला आज मोठ्या थाटात निरोप दिला जात आहे. त्यात पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीचे सगळ्यांनाच अप्रुप असते. पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पुण्याच्या महापौरांच्या हस्ते पुजा झाल्यानंतर मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू झाली. 
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानाच्या कसबा गणपतीची पुजा केली. कसबा गणपती पाठोपाठ मानाच्या अन्य गणपतींची मिरवणुकीस सुरू होईल.
 
अजित दादा पवारांच्या हस्ते भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती
गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्यात. 
पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकांना थाटात सुरुवात झाली आहे.
मानाच्या पाचही गणपतीची मिरवणुकीला सुरुवात