सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. गणेशोत्सव
  4. »
  5. गणेश महिमा
Written By अभिनय कुलकर्णी|

आधी हरतालिका की चतुर्थी?

यंदा प्रथमच तृतीयायुक्त चतुर्थी

ND
ND
चतुर्थीच्या दिवशी चंद्राने गणेशाचे तोंड पाहिल्यानंतर त्याची खिल्ली उडवली होती. त्यावर संतापलेल्या गणरायाने चतुर्थीच्या दिवशी चंद्राला पाहिल त्याच्यावर खोटा आळ येईल. त्याला खूप त्रासाला सामोरे जावे लागेल, असा शाप दिला. अर्थात नंतर गणरायाने उःशाप दिला. तरीही शापाचे महत्त्व राहिलेच. पण यंदा प्रथमच हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने या दिवशी चंद्राला पाहिले तरी दोष लागणार नाही. पण त्याचवेळी आधी हरतालिकेची पूजा करायची की गणेशाची स्थापना असा अनेकांचा गोंधळ उडाला आहे. त्यासाठीच हा लेखप्रपंच.

हरतालिका हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जाते. या वर्षी हरतालिकेच्या दुसर्‍याच दिवशी ऋषीपंचमीही असल्याने सलग दोन दिवस महिलांना उपवास करावा लागेल. उदयातिथीमुळे हरतालिका २३ ऑगस्टला सकाळी ९.३९ मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर चतुर्थी लागेल.

ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार हा अतिशय चांगला योग आहे. यात प्रत्येकाने मनोभावे जे मागितल्यास ते त्याला मिळू शकेल. यापूर्वी असा योग २९ ऑगस्ट १९९५ रोजी आला होता.

दाते पंचांगानुसार, तृतीयायुक्त चतुर्थी ज्या ज्या वेळेला येते. त्या त्या वेळी दोन्ही पूजा एका वेळी असतात. हरतालिका पूजा करतात स्त्रिया आणि गणपती पुरूष बसवतात. दोन्ही भिन्न असल्याने या दोन्ही पूजांना काही नियम नाही. आधी गणपती बसवला मग हरतालिका पूजा केली किंवा उलटे केले तरी चालेल. तृतीया ६.५७ ला संपत असली तरीही दुपारी माध्यान्हकालापर्यंत हरतालिकेची पूजा करायला हरकत नाही.