सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. गणेशोत्सव
  4. »
  5. गणेश महिमा
Written By वेबदुनिया|

गणपतीच्या विविध रूपांविषयी माहिती!

- मधुरा भोसले

ND
तारक रूपाचे कार्य करतांन
तारकतत्त्वाचे कार्य करतांना गणपति पाटावर बसलेला दिसतो. तेव्हा त्याच्या आशीर्वाद देणार्‍या हातामधून ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात क्रियाशील तारक (गणेश) शक्‍ति प्रक्षेपित होत असते.

मारक रूपाचे कार्य करतांना
मारक रूपाचे कार्य करतांना गणपति कधी उंदरावर आरूढ असतो, तर कधी वाघ, सिंह व अश्व या वाहनांवर आरूढ असतो. पाश व अंकुश यांच्या बरोबरच त्रिशूळ, भाला यांसारख्या आयुधांचा व विविध अस्त्रांचाही वापर करतो. त्या वेळी गणपति त्वेषाने लढत असतो व त्याच्याकडून संपूर्ण ब्रह्मांडात खूप प्रमाणात मारक शक्‍ति प्रक्षेपित होत असते.

तारक-मारक संयुक्‍त कार्य करतांन
गणपतीला एकाच वेळी आवश्यकतेनुसार तारक व मारक अशा दोन्ही स्वरूपांचे कार्य करावे लागते. तेव्हा त्याच्या आशीर्वाद देणार्‍या हातातून तारक शक्‍ति प्रक्षेपित होत असते व शस्त्र धारण केलेल्या हातातून खूप प्रमाणात मारक शक्‍ति प्रक्षेपित होतांना जाणवते. शस्त्रांमधील शक्‍ति ३० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत होते. त्या वेळी गणपतीकडून पाश व अंकुश यांचा प्रामुख्याने वापर होतो.

मुनी वेशातील गणपति
शिव व पार्वती यांची उपासना करतांना गणपति मुनीच्या (तपस्वीच्या) वेशात दिसतो.

सिंहासनावर रिद्धि-सिद्धि यांच्याबरोबर बसलेला गणपति
गणेशलोकातील महालात काही वेळा गणपति रिद्धि-सिद्धि यांच्याबरोबर सिंहासनावर विराजमान झालेला दिसतो. त्या वेळी तो वरील सर्व कार्ये एकाच वेळी सूक्ष्मातून आवश्यकतेप्रमाणे करत असतो. याबरोबरच गणेशभक्‍तांना मार्गदर्शन करण्याचे, त्यांना ज्ञान व सिद्धि प्रदान करण्याचे कार्य प्रामुख्याने करत असतो.

जेव्हा रिद्धि गणपतीच्या डाव्या व सिद्धि उजव्या बाजूला असते, तेव्हा गणपतीची सूर्यनाडी सुरू असते. जेव्हा रिद्धि उजव्या बाजूला व सिद्धि डाव्या बाजूला असते, तेव्हा त्याची चंद्रनाडी जागृत असते. पाटावर बसलेल्या गणपतीची जास्त प्रमाणात सुषुम्नानाडी जागृत असते. मारक रूपाचे कार्य करतांना आवश्यकतेप्रमाणे सूर्यनाडी सुरू होते.