सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. गणेशोत्सव
  4. »
  5. गणेश महिमा
Written By वेबदुनिया|

द ग्रेट जीएम 'श्री गणेशा'

ND
ND
आयुष्याच्या प्रत्येक टप्यात मॅनेजमेंट आवश्यक असते. शिक्षण असो वा करियर, घर असो वा कार्यालय प्रत्येक गोष्ट ही नियोजनावर आधारित असते. नियोजन नसेल तर काम यशस्वहोणे शक्य नाही. प्रत्येक क्षेत्रातील 'मॅनेजमेंट गुरु' आपल्या सहकार्‍यांना 'फंडे' देत असतात. आम्ही आपल्याला देत आहोत चक्क वि‍घ्‍नहर्त्या 'श्रीगणरायाचे मॅनेजमेंट फंडे' !

आराध्य दैवत विघ्नहर्ता श्री गजाननाशी संबंधित प्रत्येक गोष्‍ट व वि‍चार आपल्याला कोणता ना कोणता मॅनेजमेंट फंडा देत असते. हे आपण देखील अनुभवले असेल, मात्र ते ओळखण्‍याचे कौशल्य असणे गरजेचे आहे.

योग्य उपयोग
श्री गणेश व त्याच्या व्यवस्थापनाविषयी चर्चा करायची झाल्यास सगळ्यात आधी गणरायाचे वाहन असलेला उंदराचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उंदिर हा प्राणी अतिशय लहान परंतु, गणरायाच्या वाहनाची भूमिका पार पाडत आहे. एखादछोट्या समजल्या जाणार्‍यवस्तूचा उपयोग आपएखादे मोठे कार्य करण्यासाठकरशकतो. मात्र तउपयोग कशा पध्दतीने करता येईयाचे कौशल्य आपल्या अंगी असणे गरजेचे आहे.

नेहमी पुढ
श्री गणेश शांती व चंचलतेचे प्रतीक आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहयचे असेल तर शांततेसोबआपल्याअंगी चंचलताहअसणे आवश्यक आहे. मन शांत हवे पण पुढे जाण्याची आसही सतत हवी. शांती व चंचलता या गुणांमुळेच शिक्षण असो अथवा करियरमध्ये आपल्या नेहमी पुढे जाण्‍याची प्रेरणा मिळत असते.

संकट दूर करणार
गणेश या शब्दाचा एक अर्थ 'नेतृत्त्व करणारा' असाही होतो. कठीण परिस्थितीतून मार्ग काढून मार्गातील अडचणी तात्काळ दूर करण्याचे कार्य विघ्नहर्ता श्री गणराया करत असतो. म्हणून गणपती प्रत्येक कार्यात प्रथम वंदनीय आहे.

बुध्दी व चतुरा
गणराज व कार्तिक यांच्यात झालेली स्पर्धा ही आपल्यासाठी एक धडा आहे. परिस्थितीचे नीट आकलन करून तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता व त्याची अंमलबजावणी करण्याची प्रेरणा ही कथा देते.

एकदं
श्री गणपतीचा एक दात आपल्याला सांगतो की, आपल्यात असलेले कौशल्य सांभाळून ठेवा. अनावश्यक वस्तूचा त्याग केला पाहिजे. नाही तर 'एक ना धड भाराभार चिंध्या' अशी गत होते. त्यामुळे अनावश्यक समस्याही निर्माण होत नाही व कार्यही योग्य पध्दतीने होते.

लहान पा
कोणतेही कार्य असो ते, यशस्वीरित्या पूर्ण करायचे असेल तर त्याकडे आपले पूर्णपणे लक्ष आवश्यक आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे आपले संतुलन ढासळणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. गणपतीचे लहान पाय आपल्या संतुलित होण्याचा संदेश देत असतात. 'थेंबे थेंबे तळे साचे' म्हणत आपले लक्ष्य गाठले पाहिजे.

सतर्कता
श्री गणरायाचा उंदीर हा सतर्कतेचे (अलर्टनेस) प्रतीक आहे. यशस्वी होण्यासाठी आपण नेहमी अलर्ट राहिले पाहिजे. तसेच प्रसंगानुसार आपण गतिशील व सतर्क राहिले पाहिजे.

मोद
मोदक व लाडू हे श्री गणपतीचे आवडते पदार्थ आहेत. परिश्रमाने केलेल्या कार्यात नेहमी यश येत असते. यश मिळल्याने आपला समाधान, आनंद मिळत असतो. मोदक हे यश, आनंदाचे प्रतीक आहे.