पुराणातील गणेश
डॉ. मनस्वी श्रीविद्यालंकार
विघ्नहर्त्याचे प्रकटीकरण, त्यांच्या लीला, स्तुती व भक्तीचे वर्णन जवळपास सर्व पुराणांमध्ये आढळते. उपलब्ध वर्णनांचे सार काढून एका लेखात सामावणे अशक्य कोटीतील काम आहे. वाचकांसाठी पुराणांच्या नावांसहित संक्षिप्त वर्णन खाली देत आहोत.
पद्य पुराण : यामध्ये पार्वतीच्या मळापासून भगवान गणेशाचे गजमुखाच्या रूपातील प्रकटीकरणाचे वर्णन आहे. पवित्र गंगा मातेने त्यांना पुत्र मानल्याचा उल्लेख आहे. अर्थात म्हणूनच गणेशास गांगेय नावानेही संबोधण्यात येते. सोबतच त्याच्या लीलेचेही वर्णन आहे.
पुढे पहा शिवपुराणातील गणेश...
शिवपुराण : विघ्नहर्त्याची श्र्वेत कल्पात उत्पत्तीची कथा, गणेशाचे भगवान शंकराच्या गणांसोबतच्या अद्भूत युद्धाचे वर्णन आढळते. शंकराच्या त्रिशुलाने लंबोदराचे डोके उडवल्यानंतरचा वृत्तांत, यानंतर व्यथित झालेली पार्वती, शंकराने गजमुखास पुन्हा जिवंत करेपर्यंतचा वृत्तांत यात आहे. याशिवाय गणेशाच्या बाललीला, गणपती विवाह, नाराज झालेला कार्तिकेय या प्रसंगाचे वर्णन आढळते. महाभारतातील गणेश...