1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
  4. modak

उपवासाचे मोदक

उपवासाचे मोदक
पारीसाठी:  दोन वाट्या व-याच्या तांदळाचं पीठ, दोन टी स्पून साजूक तूप किंवा लोणी, चिमूटभर मीठ, दोन वाट्या पाणी.

सारणासाठीः दोन वाट्या ओलं खोबरं, पाऊण वाटी बारीक चिरलेला खजूर, प्रत्येकी एक टेबल स्पून बेदाणे व काजूचे तुकडे एक टेस्पून भाजलेली खसखस, दीड वाटी साखर, वेलचीपूड.

कृती : तांदळाच्या पिठाप्रमाणेच व-याच्या पिठाची उकड काढावी. नेहमीप्रमाणे सारण करून घ्यावं आणि ते भरून मोदक करावेत. उकडीच्या मोदकांप्रमाणे चाळणीवर ठेवून वाफवावेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
पनीर मावा मोदक