शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
Written By वेबदुनिया|

गणरायासाठी चॉकलेटी लाडू

सामग्री- एक वाटी रवा, एक वाटी खवा, कप भर दूध, दोन वाटी पिठी साखर, सुकामेवा अंदाजे, एक चमचा चॉकलेट पावडर, चवी पुरती इलायची पूड.

पद्धत- सुरवातीला कढईत रवा आणि खवा चांगला भाजून घ्या. त्यानंतर त्यात दूध, पिठी साखर व चॉकलेट पावडर टाकून चांगले फेटा. मिश्रण झाल्यानंतर त्यात तुकडा काजू, बदाम, किसमिस, इलायची पूड टाकून मिश्रण एकजुट होत नाही तोवर फेटा. साधारण 30 मिनिटांनी लहान लहान लाडू बांधा. लाडू सजवण्यासाठी प्रत्येक लाडूवर खोबऱ्याचा कीस व मगज लावा. तयार झालेले चविष्ट लाडूंचा नैवेद्य गणरायाला दाखवा.