शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
Written By वेबदुनिया|

काजू-पनीर बेक्ड लाडू

साहित्य : 100 ग्रॅम पनीर, खवा 300 ग्रॅम, 200 ग्रॅम पिठी साखर, 1/2 चमचा वेलची पूड, केशर काड्या, चाँदीचा वर्ख, कागदाची वाटी. 

कृती : सर्वप्रथम पनीराचा किस करून त्याला ब्राउन होईस्तोवर बेक करावा. काजूचे कापसुद्धा बेक करून घ्यावे. आता खवा किसून 2 मिनिट बेक करावा. केशर, गुलाब पाण्यात टाकून बेक्ड पनीरामध्ये मिसळून द्यावे, त्याने पनीराचा रंग पिवळा दिसेल. काजूचे काप पनीरामध्ये मिक्स करावे.

खव्यात साखर वेलची मिसळावी. पनीराचे १०-१२ गोळे तयार करावे व तसेच खव्याचेसुद्धा १०-१२ गोळे तयार करावे. खव्याची गोळी हातावर ठेवून त्यावर पनीर काजूची गोळी ठेवून चांगल्याप्रकारे बंद करून लाडू सारखे वळून घ्यावे. लाडवाला चाँदीचा वर्ख व केशराने सजवून कागदाच्या वाटीत ठेवून नैवैद्य लावावा.