शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
Written By वेबदुनिया|

ड्रायफ्रूट चॉकलेटी मोदक

साहित्य : 500 ग्रॅम कणीक, 400 ग्रॅम तूप, 400 ग्रॅम नारळाचा बुरा,15 -20 किशमिश, 15-20 बदाम, 3 चॉकलेट बार, लाल आणि पिवळ्यकँडी. 

कृती :सर्वप्रथम बदामाचे बारीक काप करून घ्यावे. तूप गरम करावे. 1/4 भाग तूप वेगळे ठेवावे व बाकी उरलेल्या तुपात कणीक भाजून घ्यावी. बुरा, किशमिश व काप केलेले बदाम त्या मिश्रणात घालावे. उरलेले तूप घालून मिश्रणाला चांगल्याप्रकारे एकजीव करून मोदकाचा आकार द्यावा.

मोदकांना फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घ्यावे. आता एका पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवावे व एक दुसरे थोडे लहान भांडे घेऊन त्यात चॉकलेट बार टाकून मोठ्या भांड्यात ते ठेवून चॉकलेट विरघळून घ्यावे. ते चॉकलेट मोदकावर पसरवून घ्यावे व लाल-पिवळ्या कँडींनी सजवून सर्व्ह करावे.