शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
Written By वेबदुनिया|

पंचरत्‍न मोदक

सामग्री-  दोन वाफवलेले बटाटे, 50 ग्रॅम शिंगाड्याचे पीठ, 100 ग्रॅम खवा, अर्धी वाटी साबुदाणा व भगरचे पीठ, 250 ग्रॅम पिठी साखर, अर्धा वाटी खोबर्‍याचा कीस, सुकामेवा, इलायची पूड व तूप.

पद्धत- सुरवातीला खवा चांगला भाजून घ्या व बाजूला ठेवा. एक चमचा तुपात दोन्ही बटाट्याचा चुरा गुलाबी होईस्तर भाजून घ्या. तूप चांगले गरम झाल्यानंतर त्यात शिंगाडा, साबुदाणा व भगरचे पीठ तांबड्या रंगाचे होत नाही तोवर भाजा. बटाट्याचा चुरा व खवा यांना एकत्र करून पुन्हा एकदा भाजून थंड होण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर त्यात पिठी साखर व इलायची पूड व सुकामेवा मिक्स करा. त्या मिश्रणाचे आपल्या मनाप्रमाणे विविध आकारात मोदक तयार करा.