मंगळवार, 19 मार्च 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
Written By वेबदुनिया|

बुंदी - चेरी मोदक

सामग्री : 1 कप साधी बुंदी, दीड कप मावा, 1 कप पिठी साखर, 1/2 कप दूध, चेरी सजवण्यासाठी. 

कृती : खव्याला हाताने चांगल्यप्रकारे मॅश करून घ्यावे. आता कढईत मावा घालून 5 मिनिट परतून घ्यावे. नंतर त्यात साखर घालून मिश्रणाला एकजीव करावे, बुंदी घालून दुधाचा शिपका द्यावा. मिश्रण जेव्हा एकजीव होईल तेव्हा गॅस बंद करावे आणि मिश्रण थंड झाल्यावर त्याचे मोदक तयार करावे. सजवण्यासाठी प्रत्येक मोदकावर १-१ चेरीचा काप लावून सर्व्ह करावे.