बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गावोगावचे गणपती
Written By
Last Updated : गुरूवार, 5 जानेवारी 2023 (08:51 IST)

कड्यावरील गणपती देवस्थान आंजर्ले

Kadyawaril ganpati mandir Anjarle
महाराष्ट्रातील कोकण या समुद्रतटीय परिसरात असंख्य मन मोहणारी स्थाने आहेत. तटाशी लागलेली पुरातन मंदिरात देवदर्शनासह नयनरम्य दृश्य मनाला आनंदाने भरुन देतात. त्यापैकी आंजर्ले येथील कड्यावरील गणपती मंदिर अत्यंत रमणीय स्थळ आहे.
 
आंजर्ले गावातील हे श्रीगणेशाचे जागृत देवस्थान `कड्यावरचा गणपती’ म्हणून प्रसिध्द आहे. दापोलीहून सुमारे 20 किमी अंतरावर स्थित या मंदिराला जाताना रस्ता दाट झाडीतून जातो. मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती साडेतीन ते चार फुटांची असून मूर्तीच्या बाजूला ॠध्दि-सिद्धीच्या मुरत्या आहेत.
 
मंदिराची स्थापना 600 वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. 1430 च्या सुमारास झाली असल्याचे सांगितले जाते. या मंदिराचे पूर्वीचे बांधकाम लाकडी होते. नंतर मंदिराचा इ.स. 1780 मध्ये जीर्णोध्दार ऊन सध्याचे मंदिर अस्तित्वात आले. हे मंदिर पेशवेकालीन वास्तुरचनेचा उत्तम नमुना आहे. मंदिर परिसरातील वातावरण खूपच शांत आणि आसपासचा परिसर अत्यंत रमणीय आहे.