मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 मे 2014 (14:50 IST)

निवडणुकीच्या ट्विटमध्ये मोदींची चर्चा सर्वात जास्त

ट्विटरवर भाजपचे नरेंद्र मोदी स्पष्ट विजेतेच्या रूपात आले आहेत आणि त्यांच्याबद्दल 1 कोटी 11 लाख ट्विट करण्यात आले आहे, जे या मायक्रो ब्लागिंग साईटवर 20 टक्के आहे.  

अमेरिकी कंपनी द्वारे जारी करण्यात आलेल्या आकड्यानुसार आतापर्यंत एकूण 5 कोटी 60 लाख ट्विट करण्यात आले आहे. यात 2014च्या लोकसभा निवडणूकीशी निगडित 1 कोटी 11 लाख ट्विटमध्ये नरेन्द्र मोदी यांची चर्चा आहे, जे एकूण ट्विटचे 20 टक्के आहे.  

आम आदमी पक्ष 82 लाख व 15 टक्के ट्विटमध्ये चर्चेत राहिली. यानंतर भाजप 60 लाख ट्विटसोबत 11 टक्क्यांची भागीदारी प्राप्त करण्यासाठी यशस्वी ठरली.  

आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचे नाव जेथे 50 लाख ट्विटमध्ये दिसून आले, तसेच काँग्रेसची चर्चा 27 लाख आणि राहुल गांधी यांची चर्चा 13 लाख ट्विटमध्ये आहे. हे ट्विट दहा सर्वात चर्चित नावांवर राहिले.