सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 20 मे 2014 (10:30 IST)

'पंतप्रधानांचे मौनच काँग्रेसच्या पराभवाला जबाबदार'

देशाचे मावळते पंतप्रधान मनमोहनसिंह मौनच काँग्रेसच्या पराभवाला जबाबदार  असल्याची टीका कॉंग्रेसचे नेते कमलनाथ यांनी केली आहे. मनमोहन सिंग हे संवाद साधण्यात  अपयशी ठरले असून याचा फटका यूपीए सरकारला बसला आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष  राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, छिंदवाडा येथून निवडून आलेले  कॉंग्रेसचे खासदार कमलनाथ यांनी पराभवाचे खापर पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्या डोक्यावर फोडले  आहे. पक्षाचा राजकीय दृष्टीकोन हा मागासलेला असून पक्षात नव्याने प्राण फुंकण्याची आवश्यकताही  त्यांनी व्यक्त केली. कमलनाथ यांनी पराभवासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पराभवाला  जबाबदार ठरवले असले तरी सरकारी योजना मात्र योग्यच होत्या असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र आता  पक्षाची नव्याने बांधणी करण्याची गर असल्याचे कमलनाथ यांनी सांगितले.