मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 16 मे 2014 (13:39 IST)

भाजप ने घडवला इतिहास, मिळाले बहुमत

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने नवीन इतिहास घडवला आहे. 30 वर्षांनंतर प्रथमच कुठल्या ही सरकारला पूर्ण बहुमत मिळणार आहे. आतापर्यंत निवडणुकीचे जे कौल समोर आले आहे त्यानुसार भाजपने आपल्या बलबूत्यावर 275 (बहुमतासाठी जरूरी 272) जागांवर आघाडी घेऊन आहे, जेव्हा की सहकार्‍यांसोबत ते (एनडीए) किमान 324 जागांवर आघाडीवर आहे.

या निकालांमध्ये सर्वात मोठा झटका यूपीए आणि काँग्रेसला लागला आहे. एकटी काँग्रेस 51 जागांवर संपुष्टात येत आहे चिन्ह दिसत आहे, जेव्हा की  सहकार्‍यांसोबत त्यांची संख्या फक्त 62वर पोहोचताना दिसत आहे.

या निवडणुकीत मायावती आणि मुलायमसिंहला मोठा धक्का बसला आहे. मायावती मात्र 2 जागेवरून आघाडीच्या स्थितीत आहे, आणि मुलायम 8 जागांवर. भाजप आणि काँग्रेसनंतर तिसरी मोठी पार्टीबद्दल सांगायचे म्हणजे ती जयललिता म्हणून समोर येऊ शकते, जेव्हाकी ममता बनर्जी या स्पर्धेत चवथ्या क्रमांकावर राहू शकते.