सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: वाराणसी , मंगळवार, 20 मे 2014 (10:46 IST)

नरेंद्र मोदींचे 'मिनी पीएमओ'

देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ वाराणसीला नवी ओळख प्राप्त होणार आहे. भविष्यात वाराणसी हे एक शक्तीशाली शहर म्हणून ओळखले जाणार आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोदी दिल्लीप्रमाणे आपल्या मतदारसंघातही 'मिनी पीएमओ' बनवू शकतात.

मोदी गटातील काही भाजप नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींची संपूर्ण टीम वाराणसीत असणार आहे. दिल्लीतील पीएम ऑफीस प्रमाणे वाराणसीत मोदी यांचे मिनी ऑफिस असणार आहे. आगामी काळात काशीमध्ये पीएमओ असणार आहे. मोदींनी वाराणसीसाठी ज्या योजना तयार केल्या आहेत, त्यांची अमंलबजावणी हे कार्यालय करणारा आहे.

वाराणसीचे महापौर रामगोपाल मोहले यांनी दिली. विशेष म्हणजे, मोदींनी या मिनी ऑफिससाठी एक इमारतीही  शोधली आहे. सिगरा येथील भाजप कार्यालय यासाठी निवडण्यात आले आहे.