मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 16 मे 2014 (18:37 IST)

पराभवाची जबाबदारी सोनिया-राहुलनी स्वीकारली

काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या दारुण पराभवानंतर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी देशाला कसे सामोरे जाणार याची अटकळ बांधली जात असतानाच या दोघांनीही धाडस दाखवत राजधानीत पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना सामोर पराभवाची जबाबदारी स्वीकारली.

केवळ एक ते दोन मिनिटांत त्यांनी आपले बोलणे आटोपते घेतले. तेवढ्या वेळात प्रथम बोलत राहुल यांनी देशात येऊ घातलेल्या नव्या सरकारचे अभिनंदन केले आणि पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगितले.

सोनिया गांधी म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाच्या नीती आणि सिद्धांतांच्या आधारावर आम्ही जनतेचा सामना केला. पण आम्हाला जनतेचे समर्थन मिळाले नाही. मतदारांच्या या निर्णयाचे आम्ही विनम्रतेने स्वागत करतो. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.