सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 20 मे 2014 (11:24 IST)

भावी पंतप्रधानांचा जोधपुरी तयार होतोय मुंबईत

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पक्षाला एकहाती बहुमत मिळाले आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी संपूर्ण देशातील अबालवृद्धांचे 'आयकॉन' ठरले आहेत. मोदी युवापिढीचे प्रेरणा स्थान बनले आहेत. 

पुढील आठवड्यात मोदी देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतील. यावेळी मोदी जोधपुरी सूट परिधान करणार आहे. हा जोधपुरी सूट मुंबईतील एका तरुणीने तयार केलेला असेल. सई सुमन असे या युवा फॅशन डिझायनरचे नाव आहे. सई गेल्या एक महिन्यापासून या सूटवर काम करत आहे. विशेष म्हणजे या सूटसाठी कोणतेही शुल्क न आकारता, मोदींना भेट स्वरूपात देणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये मोदींच्या पेहरावही चर्चेचा विषय बनला होता. त्यानुसार सईने मोदींच्या पोशाखाचे डिझाइन तयार केला. मोदींचे व्यक्तिमत्त्व व देहबोली लक्षात घेऊनच त्यांचा मी सूट डिझाइन केला आहे. मोदी हे डायनॅमिक लीडर आहेत. सध्या ते अनेकांचे स्टाइल आयकॉन ठरत आहेत. विशेष म्हणजे नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेले कपडे वापरतात. शिवाय निरनिराळ्या रंगांचे कपडेही सहज परिधान करतात, त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक खुल असल्याचे सईने सांगितले.

मोदींच्या जॅकेटवर लावण्यात आलेले कमळ चर्चेचा विषय ठरले होते. तेदेखील सईनेच तयार केले होते