'राहुल हटाव, प्रियंका लाओ' उत्तरप्रदेशात पोस्टरबाजी
16 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाल्यानंती कॉंग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची मागणी होत आहे. कॉग्रेसचा दारुण पराभव झाल्यामुळे कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. राहुल गांधींना हटवून प्रियंका गांधीकडे नेतृत्व सोपवण्याची मागणी जोर धरत आहे. अलाहाबादमध्ये कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी 'राहुल हटाव, प्रियंका लाओ' असे पोस्टर्स लावून प्रियंका गांधींनी समर्थन दिले आहे. अलाहाबाद शहर काँग्रेस कार्यकारिणीतील चिटणीस शिरीष दुबे आणि हसीब अहमद यांनी हे पोस्टर लावल्याचे समजते.
प्रियंका गांधींनी राजकारणात सक्रिय प्रवेश करावा. पक्षानेही त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी सोनिया गांधीकडे या पोस्टरच्या माध्यमातून केली आहे.
लोकसभेत झालेल्या जबरदस्त पराभवाच्या पार्श्वभूमीवर ही मागणी केली जाते आहे. राहुल यांच्या नेतृत्वातील अपयशामुळे त्यांनी पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देवून पक्षाची सुत्रे प्रियंका गांधींकडे देण्याचीही मागणी केली आहे.
राहुलयांच्यासह दिग्विजय सिंह आणि मधुसूदन मिस्त्री यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणीही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.