मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गुजरात विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : सोमवार, 5 डिसेंबर 2022 (23:50 IST)

Exit Polls: गुजरातमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता ! हिमाचलमध्ये निकराची स्पर्धा आणि दिल्लीत 'आप'ची जादू!

kamal
गुजरातमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदान सोमवारी संपले. त्यामुळे हिमाचल प्रदेश, गुजरातमधील विधानसभा निवडणुका आणि दिल्लीतील महापालिका निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील झाले आहे. हिमाचलमध्ये 12 नोव्हेंबर रोजी 68 जागांवर मतदान झाले होते, तर गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात 182 जागांवर मतदान झाले होते. त्याचा निकाल ८ डिसेंबरला लागणार आहे. त्याच वेळी, एमसीडीसाठी 4 डिसेंबरला मतदान झाले होते, त्याचे निकाल 7 डिसेंबरला येतील.
 
गुजरात विधानसभा निवडणुकीत पीएम मोदींसह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी मेहनत घेतली. अशा स्थितीत एक्झिट पोलचे अंदाज भाजपसाठी दिलासा देणारे ठरले आहेत. सर्व एक्झिट पोलने भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. यासह काँग्रेसला दुसरे आणि आम आदमी पार्टीला तिसरे स्थान मिळू शकते. पोल ऑफ पोलनुसार भाजपला 133 काँग्रेसला 38, आम आदमी पार्टीला आठ आणि इतरांना तीन जागा मिळू शकतात
.
हिमाचलमध्ये भाजपला 35, काँग्रेसला 30 आणि इतरांना तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाचे खातेही येथे दिसत नाही
 
दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाच्या दणदणीत विजयाचा अंदाज प्रत्येकाने वर्तवला आहे. भाजप दुसऱ्या क्रमांकावर असेल, असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला आहे. सर्व एक्झिट पोलचे विश्लेषण केल्यानंतर समोर आलेल्या निकालांनुसार, आपला 151, भाजपला 86, काँग्रेसला सात आणि इतरांना सहा जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Edited By - Priya Dixit