शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गुजरातनो स्वाद
Written By
Last Modified सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (15:59 IST)

आंबट-गोड भेंडीची भाजी

साहित्य : 1/2 किलो भेंड्या, लहान लिंबाएवढी चिंच, 50 ग्रॅम गूळ, एक चमचा तिखट, मीठ, एक चमचा काळा मसाला, ओले खोबरे , कोथिंबीर, मोहरी, जिरं, तेल.

कृती : सर्वप्रथम भेंड्या धुऊन स्वच्छ फडक्याने कोरड्या पुसून घ्याव्या, नंतर त्या चिराव्यात. नंतर कढईत तेल गरम त्यात मोहरी, जिरं व हिंग यांची फोडणी द्यावी. व त्यात भेंड्या टाकाव्यात. चिंच कोळून त्याचे पाणी, तिखट, काळा मसाला, गूळ व चवीप्रमाणे मीठ घालून भाजी शिजवावी. सर्व्ह करताना खोबरे व कोथिंबीर घालावी.