ज्ञानमाता मंदिराला
- श्री. गोविंदसिंग राजपूत, इगतपुरी
ज्ञानमाता-मंदिराला-वीट मी देईन म्हणतो।वीट मी होईन म्हणतो।।धृ।।पसरला अंधार नगरी, तेजाळले आम्हास त्यांनी।संस्कृती संस्कार करूनी, घडविले आम्हास त्यांनी।सागरी त्यांच्या स्मृतीच्या - मनसोक्त मी पोहीन म्हणतो।।अर्घ्य मी अर्पिन म्हणतो।।1।।त्या जरी येथून गेल्या, हृदयात अन् प्राणात वसती।गंधापरी वाहती फुलांच्या, जागेपणी स्वप्नात दिसी।फूल श्रद्धेचे तयांच्या - चरणावरी वाहीन म्हणतो।।उतराई मी होईन म्हणतो।।2।।अजुनी घुमती शब्द त्यांचे, ज्ञानियाच्या मुलुखातुनी।अमृताची धार अमजुनी, अश्रूत मिळते लोचनी।भावल्या मूर्तिपुढे त्या - आरती मी गाईन म्हणतो।।तल्लीन मी होईन म्हणतो।।3।।