ओखलेश्वर हनुमान
32 वर्षांपासून अखंड रामायणाची परंपरा
मध्यप्रदेशातील इंदूरपासून अवघ्या 35 किमी अंतरावर असलेल्या बाई या छोट्याशा गावात नवग्रह शनि मंदिरापासून 18 मैलावर ओखला येथील ओखलेश्वर मठात हनुमानाची स्वयंभू मुर्ति आहे. ब्रह्मलीन ओंकारप्रसादजी पुरोहित (पारीक बाबा) यांनी 1976 मध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी अखंड रामायण पाठास प्रारंभ केला होता. आज ही अखंड रामायण पाठाची परंपरा सुरू आहे. येथील हनुमानाच्या मूर्तित एक विशेष आहे. ते म्हणजे हनुमानाने शिवलिंग उचलले आहे. प्रत्येक महिन्याच्या रोहिणी नक्षत्राच्या दिवशी पुजारी सुभाषचंद्रजी यांच्या उपस्थितीत हनुमानाला भगवे वस्त्रे परिधान केले जातात. रामनवमी, शिवरात्री व हनुमान जयंतीनिमित्त येथे भव्य यात्रा भरत असते.