शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (23:16 IST)

गावाकडे खूप जोरात साजरी होते नागपंचमी

हिंदूंचे सण त्यात नागपंचमी आहे एक,
नागांच्या आजवरी कथा ऐकल्या आहेत अनेक,
नागदेवते ची पूजा मनोभावे करावी,
परंपरेने आपल्या त्याची आराधना व्हावी,
गावाकडे खूप जोरात साजरी करतात ही,
झोपाळे बांधून झाडाला झुलतात सारी,
दूध, लाह्यांचा दाखवतात प्रसाद नागदेवतेला,
शेतकऱ्यांचा मित्र म्हणून पूजतात नागोबाला,
जीवे कधी त्यांना मारू नये, हेच सांगणं,
सुखी ठेव सर्वांना, अन सुबुद्धी दे हेच मागण !
...अश्विनी थत्ते