शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (10:46 IST)

Nag Panchami चिरू नये,कापू नये,तळू नये,चुलीवर तवा ठेवू नये

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.
 
या दिवशी महिला घराची स्वच्छता करतात. अंगणात रांगोळी काढतात तसंच नागाची चित्रे भिंतीवर किंवा पाटावर काढून त्याची पूजा करतात. गावात अनेक ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुळाची पूजा करतात.
 
तसंच नागपंचमीच्या दिवशी अशी काही कामे आहेत जी परंपरेनुसार चुकूनही करू नयेत, असे म्हणतात. तर जाणून घ्या कोणती आहेत ती कामे- 
 
या दिवशी जमीन खोदणे किंवा शेत नांगरणे अशुभ मानले गेले जाते. म्हणून ही कामे करु नयेत.
 
या दिवशी टोकदार किंवा धारदार वस्तूंचा वारप करु नये. या दिवशी विळी, चाकू, सुई हे वापरु नये.
 
नागपंचीमच्या दिवशी जेवण तयार करताना लोखंडी भांडी वापरुन नये. तवा किंवा कढईचा वापर करु नये. असे केल्याने नागदेवाला त्रास होतो असे मानले गेले आहे.
 
अर्थातच नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात.
 
ज्यांच्या कुंडलीत राहू-केतूचा दोष आहे, त्यांनी या दिवशी विशेष रुपाने पूजा केली पाहिजे. असे केल्याने कुंडलीमुळे येत असलेल्या अडचणी दूर होतात असे मानले गेले आहे.
 
दात काढलेल्या आणि उपाशी ठेवून टोपलीतून आणलेल्या नागांचा छळ थांबववा, म्हणून प्रतीक स्वरुप नागाची पूजा करावी.
 
दूध- लाह्या हे नागाचं अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. हा आहार पावसाळ्यात माणसाच्या हिताचा असून ते मनुष्याने ग्रहण करवायचा असतो.