मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (17:23 IST)

या शिव गायत्री मंत्राने नागदेवतेची पूजा करा

Worship the snake deity with this Shiva Gayatri mantra
सर्व ज्योतिषग्रंथांव्यतिरिक्त महर्षी पराशर आणि वराहमिहिरांच्या शास्त्रांमध्येही काल सर्प दोषाचे वर्णन आढळतं. ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतू यांच्या मध्य ग्रह येतात, तेव्हा काल सर्प दोष होतो.
 
काल सर्प दोषाने ग्रस्त असणार्‍यांनी नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने लाभ होतो. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते. 
 
या दिवशी, विशेषत: शिव मंदिरात, शिव गायत्री मंत्राचा जप करून आणि चांदी, सोने किंवा तांब्याच्या नाग-नागिनची जोडी अर्पण करून काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते.
 
शिव गायत्री मंत्र
'ओम तत्पुरुषय विद्महे, महादेवया धीमही तन्नोरुद्र: प्रचोदयात.'
 
नागपंचमीच्या दिवशी शिवमंदिरात 21 चंदन उदबत्ती आणि 5 तेल किंवा तुपाचे दिवे लावून शिव गायत्री मंत्राचा जप केल्यास निश्चितच शुभ फळ प्राप्ती होते. नाग देव सोबत भोलेनाथला धन, संपत्ती, समृद्धी, ऐश्वर्य, सौभाग्य, वैभव, यश, प्रगती आणि संतान सुखाचं आशीर्वादही मिळतात.