शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: रविवार, 6 जून 2021 (10:43 IST)

अपरा एकादशी 2021 : आज अपरा एकादशी आहे, जाणून घ्या पूजेचे शुभ मुर्हूत आणि विधी

अपरा एकादशी 2021: हिंदू धर्मात एकादशी व्रत करणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, हे व्रत केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला पुण्य प्राप्ती  होते. पंचांगच्या मते, ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला अपरा एकादशी म्हणतात.एकादशी तिथी दरमहिन्याला दोनदा येते. एका वर्षात 24 एकादशी असतात. आज दिनांक 6 जून रोजी अपरा एकादशी आहे.याला अचला एकादशी देखील म्हणतात.

या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.द्वादशीच्या दिवशी हा उपवास सोडला जातो. काही लोक एकादशीला व्रत करतात. या दिवशी भात खाऊ नये. पद्मपुराणानुसार जो व्यक्ती या दिवशी उपवास करतो त्याला मोक्षाची प्राप्ती होते.आर्थिक अडचणी सुटतात, ज्यामुळे त्या व्यक्तीला आर्थिक लाभ होतो.सर्व पापांपासून मुक्ती मिळते.
 
पूजा विधी -या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करुन भगवान विष्णूचे स्मरण करावे आणि व्रताचा संकल्प करा. या दिवशी फळे खा आणि धान्य खाऊ नका. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी भगवान विष्णूची विधीवत पूजा करुन विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. दुसर्‍या दिवशी उपोषण केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्या आणि दान द्या.
 
अपरा एकादशी उपवास शुभ मुहूर्त-
एकादशी तिथी सुरुवात – 05जून 2021 सकाळी 4 वाजून 07 मिनिटांपासून
एकादशीची तारीख समाप्त – 06 जून 2021 सकाळी 6 वाजून 19 मिनिटांपर्यंत
व्रत संपन्न मुहूर्त – 07 जून 2021 रोजी सकाळी 05:12 ते सकाळी 07:59 पर्यंत असेल