शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

का करतात राख/अस्थीचे गंगेत विसर्जन?

मृत्यूनंतर राख आणि अस्थीकळश पवित्र नदी (गंगा, क्षिप्रा, गोदावरी, नर्मदा, कावेरी इतर) यात विसर्जित करण्याची प्रथा आहे. त्यातून गंगेत विसर्जन करणे उत्तम मानले आहे. धार्मिक ग्रंथाप्रमाणे गंगेला देव नदी असा मान दिलेला आहे. गंगा श्री हरी विष्णू यांच्या चरणातून निघाली आणि महादेवाच्या जटांमध्ये जाऊन बसली आहे. असे मानले आहे की मृत्यूनंतर जितके वर्ष अस्थी गंगेत राहतात, तेवढ्या वर्षापर्यंत तो व्यक्ती स्वर्गलोकात पुजला जातो. जोपर्यंत गंगेत अस्थी असते तो पर्यंत ती आत्मा शुभ लोकांमध्ये निवास करत आनंदात राहते. असे ही म्हणतात की जोपर्यंत मृत व्यक्तीचे फूल गंगेत विसर्जित केल्या जात नाही तोपर्यंत मृत आत्म्याची परलोक यात्रे प्रारंभ होत नसते. 
पवित्र नद्यांमध्ये विसर्जनामागे वैज्ञानिक कारणही आहेत. नद्यांच्या पाण्यात पारा आढळतो, ज्याने हाडांमध्ये आढळणारे कॅल्शियम आणि फॉस्फोरस पाण्यात विरघळून जाता. हे पाण्यात राहणार्‍या जंतूंसाठी पौष्टिक आहाराचे काम करते. हाडांमध्ये आढळणारे सल्फर पार्‍यामध्ये मिसळून पाण्याला स्वच्छ ठेवण्याचे काम करतं.