सोमवार, 15 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णूंची 12 पवित्र नावे जपा, जीवनातील सर्व संकटे दूर करा

हिंदू दिनदर्शिके प्रमाणे वर्षाचा नववा महिना अघन किंवा मार्गशीर्ष नावाने ओळखला जातो. धार्मिक ग्रँथामध्ये मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व सांगितले आहे. या महिन्यात श्री हरी विष्णू यांची पूजा करावी. या महिन्यात भगवान विष्णूंच्या या 12 नावांचे जप केल्यानं जीवनातील सर्व संकटे दूर होऊन लक्ष्मी म्हणजे धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. जर आपण आपल्या शत्रूंपासून त्रासलेला आहात तर हे नाव जपल्यानं शत्रू भय नाहीसे होतात. 
 
भगवान विष्णूंची 12 नावे खालील प्रमाणे आहेत.  
 
* अच्युत, 
* अनंत, 
* दामोदर, 
* केशव, 
* नारायण, 
* श्रीधर, 
* गोविंद, 
* माधव, 
* हृषिकेश, 
* त्रिविकरम, 
* पद्मनाभ 
* मधुसूदन
भगवान विष्णूंची ही 12 नावे घेत त्यांना पिवळी फुले अर्पण करावी. देवाचे 1 नाव घ्या आणि 1 फुल अर्पण करा. पूजा झाल्यावर संध्याकाळी या फुलांना देवाच्या समोरून काढून घ्या आणि वाहत्या पाण्यात किंवा पिंपळाच्या झाडा खाली व्हा.
 
Edited By- Priya Dixit