1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

वाईट स्वप्न येत असतील तर हे करा...

स्वप्न आमच्या विचारांशी जुळलेली असतात. ज्या गोष्टींबद्दल आम्ही अधिक विचार करतो झोपेतही त्याबद्दल स्वप्न येतात. स्वप्न चांगले आणि वाईट दोन्ही असू शकतात. अनेकदा शरीर किंवा मनात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करून जाते ज्यामुळे स्वप्न पडतात. हे उपाय अमलात आणून नकारात्मक ऊर्जा दूर करू शकतो:
 
* रात्री वाईट स्वप्न दिसत असल्यास आपल्या इष्टदेवाचे नाव घेणे सुरू करा. त्यांचा जप करा. हा जप तोपर्यंत करत राहा जोपर्यंत मनाला शांत वाटत नाही.
 
* दुर्गा देवी आपल्या भक्तांची रक्षा करते. म्हणून देवीची आराधना करा.
 
* वाईट स्वप्न बघितल्यानंतर उठून स्नान केल्यानंतर दुर्गा सप्तशती यात ‍वर्णित तन्त्रोक्तं रात्रिसूक्तम पाठ करा.
हा पाठ केल्याने वाईट स्वप्नाचेही चांगले फल लाभेल.
 
* शरीरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी बादलीत पाणी भरून त्यात मीठ टाकावं. 10 मिनिट बादलीत पाय बुडवून ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आरामात झोप लागते.