शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

नियमित म्हणावे असे उपयोगी मंत्र

Mantra
(1) अन्नाचा दृष्टी दोष घालवण्याचा मंत्र (एकदाच म्हणावा)
अन्नं ब्रम्ह रसो विष्णूर्भोक्ता देवो महेश्वराः।
इति संचित्यं भुंजानं दृष्टी दोषो न बाधते।।
 
(2) जेवणास सुरूवात करण्या आधी म्हणावयाचा मंत्र —
अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे।
ज्ञान वैराग्य सिदध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती।।
 
(3) जेवणापुर्वी म्हणण्याचा असाच एक गीतेतील श्लोक —
ब्रम्हार्पणं ब्रम्ह हविः ब्रम्हाग्नौ ब्रम्हणाहुतम्‌।
ब्रम्हैव तेन गंतव्य ब्रम्ह कर्म समाधिना।। 
 
(4) नेत्र विकार होऊ नयेत म्हणून जेवण झाल्यावरचा मंत्र — 
स्वर्यातिंच सुकन्यांच च्यवनं शक्रमश्विनौ।
भोजनान्ते स्मरेद यस्तु तस्य चक्षुर्न हीयते।।
हात धुतल्यावर ओल्या हाताने दोन्ही डोळ्यांवर अल्प घर्षण करून पाणी लावावे
 
(5) भोजन झाल्यावर योग्य रितीने अन्न पचन व्हावे म्हणून जेवणानंतर मंत्र म्हणत पोटावरून हात फिरवावा.
अगस्त्यं कुंभकर्णं च शनिं च वडवानलं।
आहार प्रति पाकार्थम्‌ स्मरामि च वृकोदरम्‌।।
अतापि भक्षितो येन वातापीच महाबलः।
अगस्तस्य प्रसादेन भोजनं मम जीर्यताम्‌।।
श्रद्धा असल्यास या मंत्रांचा अनुभव येतो
 
(6) लहान मुलांना नजर, दृष्ट लागते त्यावर मंत्र— 
अंजनी गर्भ संभूतं कुमारं ब्रम्हचारिणम्‌।
दृष्टी दोष विनाशाय हुनुमंतं स्मराम्यहम्‌।।
 
(7) मृत्युसमयी जे अनाथ असतात, ज्यांचे श्राद्ध कोणी करीत नाही, अशांचे सर्वत्र आत्मस्वरूप एक आहे या करूणामय भावनेने, दुर्लक्षित असा मृतांना अन्नदान करण्याचा मंत्र —
येषां न माता न पिता न बंधुनैवान्नसिद्धिर्न यथान्नमस्ति।
तत्‌ तृप्त यन्नं भुविदत्त मेतत्‌ प्रयान्तु तृप्तीं मुदिता भवन्तु।।
हा मंत्र अनंत पुण्य मिळवून देणारा आहे. श्राद्ध पक्षाच्या महिन्यात अमावास्येला एका पत्रावळीवर अन्न घराबाहेर ठेवून हात जोडून हा मंत्र म्हणावा— 
 
(8) गाढ निद्रा येण्यासाठी, झोपताना खालील मंत्र म्हणावा — 
अगस्तीर्माधवश्चैव मुचकुन्दो महाबलः।
कपिलो मुनि रास्तिकः पंचैते सुख शायिनः।
 
(9) वाईट स्वप्ने पडू नयेत यासाठी झोपण्या अगोदर हा मंत्र म्हणावा—
अच्युतं केशवं विष्णुं हरि सोम जनार्दनम्‌।
हंसं नारायणं कृष्णं जपेत्‌ दुःस्वप्न शान्तये।।
 
(10) घराबाहेर पडल्यानंतर, घरी परत येईपर्यंत रक्षण व्हावे यासाठी मंत्र — 
वनमाली गदी शारंगी शंखी चक्रीय नन्दको।
श्रीमान्‌ नारायणो विष्णूर्वासुदेवो भिरक्षतु।।
 
(11) मंत्र जप, पूजा, पारायण, नामस्मरण करताना आळस कंटाळा येतो तेव्हा खालील मंत्र म्हणावा — 
इंद्रनीळ रंग राम शामधाम योगिया।
नामपूर्ण काम सार पार भव रोगीया।।
 
(12) श्रीमत्‌ वासुदेवानंद सरस्वतींनी श्री मारूतीचा स्मरणमंत्र संध्याकाळी दिवा लावताना म्हणावा असे सांगितले आहे तो मंत्र — 
अंजनी सूता रूद्रावतारा। जय रामदूता भव भय सारा नरसिंह मूर्ते। जय हतभीते।। 
या मंत्राने संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी घरात दुष्ट शक्ती येत नाहीत
 
(13) विवाहितेला किंवा कोणत्याही स्त्रीला घरी मानसिक—शारिरिक त्रास होत असेल तेव्हा खालील मंत्रविधी करावा, कष्ट जातात — 
दुर्गाआईचा फोटो समोर ठेवून आपल्या वयाच्या दुप्पट जप करावा.
सृष्टीदेवी नमस्तुभ्यं अखिलानंद दायिनी।
सौख्यकर्ती दुःखहर्ती महादेवी नमोस्तुते।।
जप झाल्यावर डोळे मिटून मनात देवीचे ध्यान करावे. सर्व कष्ट जाऊन, आनंदी वातावरण घरात निर्माण होते.
 
(14) कोणत्याही जपा अगोदर किंवा मंत्रोपासना नसेल तरीही नित्य म्हणजे रोजच सर्व उपासनेच्या अगोदर श्रीमत्‌ वासुदेवानंद सरस्वती प्रणित ‘चित्त स्थैर्यकरं स्तोत्रम्‌' हे सहा श्लोकाचे स्तोत्र म्हणावेच.
 
(15) त्रिविध ताप (त्रिविध दुःख) दूर करून मनाला सुख शांति देणारे श्रीमत्‌ वासुदेवानंदांचे ‘शान्ति स्तोत्रम्‌' चे 900 पाठ अवश्य करावेत. अत्यंत अनुभव सिद्ध स्तोत्र आहे.
 
- सोशल मीडिया