गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

गरूड पुराणानुसार या 5 कामांमुळे आयुष्य होतं कमी

avoid thing in life
गरूड पुराणात असे काही काम सांगितले गेले आहे ज्यामुळे आपल्या समस्या वाढू शकतात. आपलं आयुष्य कमी होऊ शकतं. तर आज आपण जाणून घ्या असे 5 काम ज्यामुळे जीवाला धोका असतो. तर निश्चितच हे काम टाळा आणि दीर्घयुष्य व्हा.
 
 
1. सकाळी शारीरिक संबंध स्थापित केल्याने वय कमी होतं.
 
2. सकाळी उशिरा झोपून उठल्याने आयुष्य कमी होतं. आम्हाला ब्रह्म मुहूर्त उठून फिरायला जायला हवे. ज्याने सकाळची शुद्ध आणि अधिक प्रमाणात ऑक्सिजन शरीराला मिळाल्याने आजार दूर राहतात, श्वसन तंत्र स्वस्थ राहतं. सूर्योदयानंतर उठल्याने शरीराची प्रतिकारक शक्ती कमी होत जाते.
 
3. रात्री दह्याचे सेवन टाळावे. याने अनेक प्रकाराचे आजार होण्याची शक्यता वाढते. याने आपली आयू कमी होऊ शकते.
 
4. शिळं मास सर्वात घातक असतं. शिळं मास खाल्ल्याने कर्करोग सारखे आजार पसरतात. शिळं मास खाल्ल्याने पोटात बॅक्टेरिया गेल्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता वाढते.
 
5. कोणचा मृत्यू झाल्यावर स्मशानात जाण्याची वेळ येते. अशात शव दहन होताना त्यातून निघार्‍या धुरात अनेक प्रकाराचे हानिकारक तत्त्व निघतात. मृत देहात अनेक प्रकाराचे बॅक्टेरिया आणि व्हायरस उत्पन्न होऊ लागतात. अशात मृत देहाला जाळताना त्यातील काही बॅक्टेरिया आणि व्हायरस तर अग्नीत नष्ट होतात परंतू काही वातावरणात धुरामुळे पसरतात. धुराच्या संपर्कात आल्यामुळे बॅक्टेरिया व्हायरस शरीराला चिकटून जातात आणि आजार पसरवतात. अशाने देखील आयुष्य कमी होण्याची शक्यता असते.
 
तर या 5 कार्य करताना सावधगिरी बाळगली तर निश्चितच आपल्याला आरोग्य आणि दीर्घयुष्य प्राप्त होऊ शकतं. यातून काही कार्य तर टाळता येतात परंतू काही कार्य करताना जसे की स्मशानात गेल्यावर सावध राहणे गरजेचे आहे.