श्री गुरूंना पंच पक्वान्न, नक्की वाचा
नैवेद्यासाठी तुमच्या
काय आणू स्वामी
पंचपक्वान्न पहा
आज तयार केली मी
ताटावरती हिरवी तुळस
हळूच मी ठेवली
सजलेले ताट पाहुनी
प्रसन्न हसली गुरुमाऊली
पंचपक्वान्न म्हणजे काय
थांब मी सांगतो
तुझा नैवेद्य आधी
आनंदाने ग्रहण करतो
पहिले पक्वान्न असे 'भक्ती'
ज्याचा भगवंत भुकेला
असेल मनात जर
नक्की धावतो हाकेला
'श्रद्धा 'आणि विश्वास
असे पक्वान्न दुसरे
ठेवलास माझ्यावरी
मग मी तुला कधी न विसरे
तिसरे पक्वान्न
जी करतेस 'उपासना'
ज्यामुळे फिरकत नाही
तुजपाशी दुष्ट वासना
पक्वान्न चौथे
असे स्मरण आणि 'जप'
ज्यामुळे जीवनात येई
आनंद अमूप
'समर्पण' आणि 'शरणागती'
असे पक्वान्न पाचवे
भवभया पासून
तुजसी जे वाचवे
हीच पाच पक्वान्ने
गुरुमाऊली ला प्रिय
नैवेद्यातील आनंदही
असे मग अद्वितीय