गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: रविवार, 8 ऑगस्ट 2021 (17:13 IST)

शिवलिंगावर दूध अर्पण करण्याचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण

शिवलिंगावर भगवान शंकराच्या निराकाराला आपण दूध, तूप, मध, दही, पाणी इत्यादी का अर्पण करतो? याला दोन कारणे आहेत, पहिले कारण वैज्ञानिक आहे आणि दुसरे कारण पौराणिक आहे. दोन्ही कारणे थोडक्यात जाणून घ्या- 
 
पौराणिक कारण
पौराणिक कथेनुसार,जेव्हा समुद्र मंथन केले गेले,तेव्हा प्रथम त्यातून विष बाहेर आले.या विषाचा धोका संपूर्ण जगावर येऊ लागला.ही आपत्ती पाहून सर्व देवता आणि राक्षसांनी भगवान शिव यांच्याकडे यापासून बचावासाठी प्रार्थना केली.कारण या विषाची उष्णता आणि परिणाम सहन करण्याची क्षमता फक्त भगवान शिव यांच्याकडे होती. भगवान शिवाने कोणत्याही क्षणाचा विलंब न करता जगाच्या कल्याणासाठी संपूर्ण विष आपल्या कंठात धारण केले. विषाची तीव्रता आणि उष्णता इतकी होती की भोलेनाथांचा गळा निळा पडला आणि त्यांचे शरीर उष्णतेने जळू लागले.
 
जेव्हा विषाचा प्राणघातक परिणाम शिव आणि शिवाच्या केसांमध्ये विराजमान असलेल्या गंगा देवीवर पडू लागला तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी पाण्याची थंडता देखील कमी जाणवू लागली.सर्वांचा सल्ला ऐकून विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी भगवान शिवाने दूधाचे सेवन केले आणि त्यांच्यावर दुधाने अभिषेकही करण्यात आले.
 
तेव्हापासून शिवलिंगावर दूध अर्पण करण्याची परंपरा चालू आहे.असे म्हटले जाते की महादेवाला दूध प्रिय आहे आणि श्रावण महिन्यात त्यांना दुधाने अभिषेक केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
 
 
वैज्ञानिक कारण
 
1. असे म्हटले जाते की शिवलिंग हा एक विशेष प्रकारचा दगड आहे. या दगडाला क्षरणापासून वाचवण्यासाठी त्यावर दूध,तूप,मध साखर या प्रकाराचे गुळगुळीत आणि थंड पदार्थ अर्पण केले जातात.
 
2. जर तुम्ही शिवलिंगावर काही चरबीयुक्त किंवा तेलकट पदार्थ अर्पण केले नाही तर कालांतराने ते ठिसूळ होऊन खंडित होऊ शकतो. परंतु जर त्याला नेहमी ओलसर ठेवले गेले तर ते हजारो वर्षे तसंच राहील. कारण शिवलिंगाचा दगड वरील पदार्थ शोषून घेतो जे एकाप्रकारे त्याचं अन्न आहे.
 
3. दूध,तूप,मध,दही इत्यादी शिवलिंगावर योग्य प्रमाणात आणि विशिष्ट वेळी अर्पण केले जातात आणि शिवलिंग हातांनी चोळले जात नाही. जास्त प्रमाणात अभिषेक केल्यास किंवा हातांनी चोळल्यास शिवलिंगाचे क्षरण होऊ शकतं. म्हणूनच विशेषतः सोमवार आणि श्रावण महिन्यात अभिषेक करण्याची परंपरा आहे.