शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Sankashti Chaturthi Vrat गणपतीची कृपा मिळवण्यासाठी केवळ एक उपाय

संकष्टी चतुर्थी आणि बुधावर हा संयोग जुळून आला आहे. अशात ही संधी साधण्यासाठी आज आम्ही आपल्याला 9 उपाय सांगत आहोत ज्यातून कोणताही एक उपाय करून आपण गणपतीची कृपा मिळवू शकता. 
 
* जर आपला जीवन साथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपतीसोमर ठेवावा. ऊँ 
 
* विघ्नेश्वराय नम: मंत्र 11 वेळा जपावे. नंतर देवाची प्रार्थना करून दोर्‍यला सात गाठी बांधून स्वत:जवळ ठेवावा. असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल. 
 
* व्यवसाय संबंधी समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे. गणेश चालीसाचा पाठ करावा. चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात. 
 
* जीवनात बल कायम ठेवू पात असाल, बहादूर म्हणून आपली ओळख राहावी अशी इच्छा असल्यास गणपतीची विधी विधानाने पूजन करावे आणि गणपतीला लाल शेंदूर अर्पित करावे. गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने सन्मान, बल प्राप्ती होईल.
 
* ऑफिसमध्ये आपल्या सीनियर किंवा बॉस, उच्च अधिकार्‍यांशी चांगले संबंध ठेवू बघत असाल तर चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपतीसमोर आसन मांडून बसावे. मग श्री गणेशाय नम: या मंत्राचा 21 वेळा जप करावा. जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदाचे फुल अर्पित करावे. असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतील.
 
* जर आपल्याला दांपत्य जीवनात गोडवा टिकून राहवा अशी इच्छा असेल तर गणपतीची पूजा करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिलक करावे आणि देवासमोर तुपाचा दिवा लावावा. याने नात्यांतील गोडवा टिकून राहील.
 
* कुटुंबातील आनंद, सुख-समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ऊँ गं गणपतये नम: मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील. सुख-समृद्धीत वृद्धी होईल. 
 
* जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला रोली, आणि अक्षतांनी तिलक करावे. सोबतच गणेश मंत्र वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ: निर्विघ्नं कुरू में देव सर्व कार्येषु सर्वदा | मंत्राचा 11 वेळा जप करावा.
 
* अभ्यासात कोणत्याही प्रकाराची अडचण येत असल्यास किंवा नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असल्यास चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडालावा. मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणी अर्पित करावे. असे केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतील.
 
* विद्याच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणार्‍यांनी चतुर्थीला दूर्वाच्या सात जोड्या तयार करून गणपती मंदिर अर्पित कराव्या आणि कापुराने गणपतीची आरती करावी. असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळतं.