श्रीस्वामीसमर्थ प्रकट दिन : श्रीस्वामीसमर्थांचे पद

swami samarth
Last Modified बुधवार, 14 एप्रिल 2021 (21:33 IST)
कर्दळीवनी गुप्त होती।
द्वितीयावतारी श्रीनृसिंह सरस्वती।
पंचशताब्दी नंतर प्रकटले।
नरसिंह भान स्वामी समर्थ तेथे।।१।।

अजाणूबाहू दिव्य तेजकांती।
जणू रवि शशीस ही पडे भ्रांती।
तेथूनी प्राकट्य त्यांचे होई।
अक्कलकोटी ग्रामी अवतीर्ण होई।।२।।

चोळाप्पा भक्त अति भाग्यवान।
धन्य त्याचे ते निवासस्थान।
परीसस्पर्श लाभला स्वामींचा।
भाग्यास ही हेवा वाटे या भाग्याचा।।३।।

विरभद्र रुपात दर्शन स्वामी देती।
त्रिशूळ, कोयता, ही आयुधे करी असती।
साडेसात फूट उंची ज्यांची।
काय वर्णू मी थोरवी स्वामींची।।४।।

अंगरखा आणि रुद्राक्षमाळ।
सोबत पादुका त्या निर्मळ।
अजून शक्तीस्रोत आहे तेथे।
धन्य ती वास्तू, जेथे वास्तव्य होते।।५।।

याच वास्तूत विहीर कोरडी ती।
स्वामी तिच्यात लघुशंका करिती।
गोड झरा अमृताचा फुटून वाही।
अद्यापि आहे देण्यास प्रचीती।।६।।

वटवृक्ष मंदिरी स्वामींचे नित्य स्थान।
" हम गया नही, जिंदा है।" हे भक्तांसी अभिवचन।
" भिऊ नको, मी पाठीशी आहे," केवढा हा आधार।
या स्थितीत स्वामीच तारणार।।७।।

कृष्ण पक्षातील त्रयोदशी/चतुर्दशी तिथी।
मास चैत्र होता, चवथ्या प्रहरी।
स्वामी बैसले निजानंदास तेथे।
चोळाप्पा वास्तू पुनः पुनः धन्य होते।।८।।
जय स्वामी समर्थ किती आळवावे।
या कठीण काळी तूच बा पाहावे।
नको अंत पाहू, देई शक्तीस अर्थ।
सतत आळवू आम्ही जय स्वामी समर्थ।।९।।


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

Guru Pushya Nakshatra: 60 वर्षांनंतर आला दिवाळीपूर्वी खरेदी ...

Guru Pushya Nakshatra: 60 वर्षांनंतर आला दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा एक अतिशय शुभ योगायोग
दिवाळीनिमित्त भरपूर खरेदी करण्याची परंपरा वर्षांची आहे. या प्रसंगी, लक्ष्मीपूजनामध्ये ...

करावी साजरी कोजागिरी रात्रभर जागुन!

करावी साजरी कोजागिरी रात्रभर जागुन!
करावी साजरी कोजागिरी रात्रभर जागुन!

आठवतात ते भुलाबाई चे गाणे

आठवतात ते भुलाबाई चे गाणे
आली आज कोजागिरी पौर्णिमा, आठवणी कितीतरी मनात

दिवाळीपूर्वी घरातून या 7 गोष्टी काढून टाका, यामुळे गरिबी ...

दिवाळीपूर्वी घरातून या 7 गोष्टी काढून टाका, यामुळे गरिबी आणि नकारात्मकता वाढते
देवी लक्ष्मीची पूजा आराधना करण्याचा महान सण म्हणजे दीपावली. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष ...

शरद पौर्णिमेच्या निमित्त खीर बनवा, सोपी रेसिपी

शरद पौर्णिमेच्या निमित्त खीर बनवा, सोपी रेसिपी
धार्मिक मान्यतेनुसार शरद पौर्णिमेला चंद्र आपल्या सोळा कलांनी समृद्ध होऊन रात्र भर आपल्या ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...